मुंबईः महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या 2750 मिलीमीटर व्यासाच्या उर्ध्व वैतरणा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. आग्रा रोड व्हॉल्व्ह संकुल (ARVC) ते पोगावदरम्यान येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉइंटच्या दुरुस्तीचे काम 22 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. त्यामुळे मुंबईतल्या एन आणि एल विभागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार असून, काही ठिकाणी पाणीपुरवठ्यात 15 टक्क्यांची कपात होणार आहे.
22 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 दरम्यान 24 तासांसाठी मुंबईत 15 टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. या दुरुस्ती कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये मंगळवार 22 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून बुधवार 23 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत 24 तासांच्या कालावधीत 15 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

तसेच मंगळवार 22 डिसेंबर 2020 रोजी एन विभागामध्ये घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथे कप्पा एकला पाणीपुरवठा करणाऱ्या 1400 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील 1400 मिलीमीटर व्यासाची झडप बदलण्याचे काम नियोजित आहे. हे काम मंगळवारी 22 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून बुधवार, 23 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे काही भागांमध्ये मंगळवारी 22 डिसेंबर 2020 रोजी पाणीपुरवठ्यामध्ये 15 टक्के कपात करण्यात येईल. तर एन आणि एल विभागातील काही भागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.

मुंबईतल्या या भागात काही ठिकाणी पाणी पुरवठा पूर्णतः बंद, तर काही ठिकाणी कपात
1. शहर: ए, बी, सी, डी, ई, जी/उत्तर व जी/दक्षिण – 15 टक्के

2. पश्चिम उपनगरेः संपूर्ण पश्चिम उपनगरे (एच/पूर्व, एच/पश्चिम, के/पूर्व, के/पश्चिम, पी/उत्तर, पी/दक्षिण, आर/उत्तर, आर/मध्य, आर/दक्षिण) – 15 टक्के

3. पूर्व उपनगरेः एल, एन, एस – 15 टक्के

4. एन विभाग – प्रभाग क्रमांक 123, 124, 126, 127, 128, 130 मधील आनंदगड, शंकर मंदीर, राम नगर, हनुमान मंदीर, राहूल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, वर्षानगर, जय मल्हार नगर, खंडोबा टेकडी, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षानगर टाकी (वर्षानगर येथील शोषण टाकी व उदंचन केंद्रामार्फत वितरण होणारा संपूर्ण परिसर), डी आणि सी महापालिका वसाहत, रायगड विभाग, गावदेवी पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरा नगर २, अमीनाबाई चाळ, कातोडी पाडा, भीम नगर, इंदिरा नगर १, अल्ताफ नगर, गेल्डा नगर, जगदुशा नगर, गोळीबार मार्ग, सेवा नगर, ओ.एन.जी.सी. वसाहत, माझगांव डॉक वसाहत, गंगावाडी प्रवेशद्वार क्रमांक २, अंशतः विक्रोळी पार्क साईट परिसर (आनंदगड शोषण टाकी व उदंचन केंद्राद्वारे वितरण परिसर), सिद्धार्थ नगर, साईनाथ नगर आणि पाटीदारवाडी, भटवाडी, बर्वे नगर, काजू टेकडी, न्यू दयासागर व रामजी नगर इत्यादी – पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.

5. एल विभाग – प्रभाग क्रमांक 156, 158, 159, 160, 161, 164 मधील संघर्ष नगर, खैराणी मार्ग, यादव नगर, जे. एम. एम. मार्ग, लक्ष्मीनारायण मंदीर मार्ग, कुलकर्णी वाडी, सरदारवाडी, डिसूझा कंपाऊंड, अय्यप्पा मंदीर मार्ग, मोहिली पाईपलाइन, लोयलका परिसर, परेरावाडी, इंद्र मार्केट, भानुशाली वाडी, असल्फा गाव, एन.एस.एस. मार्ग, नारायण नगर, साने गुरुजी पंपिंग, हिल नंबर 3, भीम नगर, आंबेडकर नगर, अशोक नगर, हिमालय सोसायटी, वाल्मिकी मार्ग, नुराणी मस्जिद, मुकुंद कंपाऊंड, संजय नगर, समता नगर, गैबण शाह बाबा दर्गा मार्ग इत्यादी – पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. मुंबईकर नागरिकांनी या पाणीकपात कालावधीत पाण्यााचा यथायोग्य साठा करावा आणि पाणी जपून वापरावे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page