आचरा /-
श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी चा ८वा वर्धापन दिन दि.२६ डिसेंबर ते २८डिसेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर हा सोहळा साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाबू हडकर, उपाध्यक्ष सदा राणे यांनी दिली आहे. तरीसर्व स्वामी भक्तांनी गर्दी होणार नाही याची काळजी घेत सुरक्षिततेच्या उपाययोजना करत स्वामी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी तर्फे करण्यात आले आहे.