सावंतवाडी /-
शालान्त परीक्षा मार्च 2020 च्या परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. त्यानिमित्त शाळेतील पहिले पाच विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यामध्ये साबाजी नाईक, पौर्णिमा महाले, सेजल शेर्लेकर, आदेश सावळ व रितू पिंगुळकर या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर भिकाजी धुरी, कास सरपंच खेमराज भाईप, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, माजी सरपंच प्रकाश गावडे, शेर्ले सरपंच उदय धुरी, पत्रकार मंगल कामत, श्रीकृष्ण भोगले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक हनुमंत मालवणकर आणि मुख्याध्यापक सदाशिव गवस उपस्थित होते.कार्यक्रमात पाचही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आपल्या यशाचे श्रेय पालक व सर्व शिक्षक यांना दिले. तसेच सर्व मान्यवरांनी आपापल्या मनोगतातून सर्वांचे अभिनंदन आणि पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी खेमराज भाईप यांनी विद्यार्थ्यांना भेटवस्तू व शाल तर सुरेश गावडे यांनी आकर्षक चषके दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाशिव गवस यांनी तर सूत्रसंचालन आणि मान्यवरांचे आभार एस.एन सावंतयांनी मानले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.