एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर.;

एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर.;

मुंबई /-

एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलने जाहीर केल्या आहेत. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन दिले आहे. सुप्रीम कोर्टानं सीईटी घेण्यास अधिकृत परवानगी दिल्यानंतर आणि उच्च आणि तांत्रिक शिक्षण विभागाच्या सीईटी सेलनं परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. *तारखा पुढीलप्रमाणे* : १) पीसीबी ग्रुप – १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ ऑक्टोबर २०२० २) पीसीएम ग्रुप – १२, १३, १४, १५, १६, १९, २० ऑक्टोबर २०२० *डाऊनलोड* : परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असून प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना या वेबसाईटवरुन डाऊनलोड करता येणार आहे. *आवाहन* : उमेदवारांनी परीक्षेविषयीच्या अपडेट व सूचना जाणून घेण्यासाठी www.mahacet.org या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन सेलकडून करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..