शाळकरी मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी युवकावर फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल..

शाळकरी मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी युवकावर फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल..

कणकवली /-

देवगड -निपाणी मार्गालगतच्या एका गावातील १५ वर्षीय मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना बुधवारी १६ डिसेंबर रोजी घडली.याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात विनयभंग आणि अल्पवयीन मुलीची छेडछाड,लैगिक छळाचा पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. हृतिक कमलाकर कदम रा.कोळोशी असे विनयभंग करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

इयत्ता दहावीत असलेली मुलगी हास्कुल सुटल्यानंतर रस्त्याने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घरी जात असतांना वाटेत अडवून मुलीची छेड़ काढली.तिचा हात पकडून तू माझ्याशी प्रेम कर असे सांगून विनयभंग केला.मुलीने विरोध केला असता शिवीगाळ करून धमकी दिली. त्यानंतर मुलगी रडत घरी आली आणि आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला.त्यानंतर कणकवली पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षक धुमाळ यांची भेट घेतली व घडला प्रकार कथन केला.त्यानंतर महिला पोलीस अधिकारी पाटील यांनच्या कडे तपास दिला त्यानंतर घटनास्थळी जाऊन तपास करून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.त्यानंतर भादवि 354 (अ) (ड), 504, 506 तसेच बालकाचे लैगीक अत्याचारापासून संरक्षण 8 – 12 ( पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..