मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी डेपोचा गेटबंद करताच पोलिसांनी घेतले ताब्यात..

कुडाळ /-

कुडाळ एसटी डेपोतील बेस्ट सेवेसाठी पाठवण्यात आलेले २० एसटी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समजतात मनसे आक्रमक..होत आज कुडाळ येथे आंदोलन केले.हे आंदोलन मनसेचे बनी नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.मनसेने एसटी डेपोचा गेट बंद करत गाड्या रोखण्याचा प्रयत्न केला.,,मात्र घटनास्थळी कुडाळ पोलिसांनी हस्तक्षेप करत मनसेच्या सर्व आंदोलकांना ताब्यात घेत,सर्वाना पोलीस व्हॅनमद्धे बसवून कुडाळ पोलीस स्टेशन मद्धे आणले.यावेळी बनी नाडकर्णी यांच्या सोबत राजू कासकर -जिल्हाध्यक्ष एसटी कामगार सेना , श्री.धीरज परब -जिल्हाध्यक्ष मनसे , श्री.संतोष भैरवकर कार्याध्यक्ष मनसे कामगार सेना .,श्री.गणेश वाईरकर माजी तालुकाध्यक्ष मनसे मालवण, जगंनाथ गावडे कुडाळ उपतालुका अध्यक्ष मनसे , रमाकांत नाईक कुडाळ शहर सचिव मनसे, सुबोध परब मनसे पदाधिकारी, यांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले.

गेल्या १५ दिवसापूर्वी बेस्ट सेवेसाठी पाठवण्यात आलेल्या ४८ एसटी कर्मचाऱ्यांनपैकी कुडलमधील २० कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कुडाळ एसटी डेपोतून बेस्ट सेवेसाठी पाठवण्यात आलेले ४८ कर्मचारी सिंधुदुर्गात परत आले असता त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. कोरोना तपासणी मध्ये २० एसटी कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आलेत यावर आज महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे उपाध्यक्ष श्री बनी नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळमद्धे मनसेच्या वतीने एसटी डेपोत आंदोलन करण्यात आले.यावेळी पोलिसांनी हे मनसेचे आंदोलन चीरडण्याचा प्रयत्न केला.. आणि सर्वांना पोलीस व्हॅन मद्धे बसवून कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये नेले.

या अगोदरही बेस्ट सेवेसाठी पाठवण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनपैकी ५ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले होते त्यांना १४ दिवस त्यांच्याच घरी कॉरंटाईन करून ठेवण्यात आले होते.एसटी प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाशी सामना करावा लागत आहे.असे महाराष्ट्र कामगार सेने उपाध्यक्ष श्री.बनी नाडकर्णी यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.

यापुढे धीरज परब म्हणाले की,एवढं सगळं होऊनही परत अजुन कर्मचारी बेस्ट सेवेसाठी मुंबईत पाठवण्यात आले.या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता एस टी प्रशासनाला एसटी कर्मचाऱ्यांची पर्वा नसल्याच स्पष्ट होत आहे.असे मनसे जिल्हाध्यक्ष श्री.धीरज परब यांनी मीडिया शी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page