कुडाळ /-
कोरोनामुक्त झालेल्या कुडाळ मध्ये पुन्हा रूग्ण वाढण्यास एसटी प्रशासनच जबाबदार आहे.एसटीचे चालक मुंबईत पाठवण्यात आल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.त्यामुळे आता थांबा आणि योग्य तो निर्णय घ्या,अशी मागणी आज कुडाळ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांकडे केली.
दरम्यान याबाबत योग्य तो न्यायन मिळाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करेल,असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष विनायक राणे यांनी दिला आहे.मुंबईत पाठवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा परत गावी आल्यावर कोणतीहि उपाययोजना ही एसटी दडपोने केली नसून याउलट २० कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.एसटीच्या या गलथन कारभारामुळे कोरोनाची संख्या कुडाळ मद्धे अजून वाढत आहे.यावर योग्य तोडगा काढा पुन्हा तीव्र आंदोलन भाजप करेल,असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.