मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) या महिन्याच्या अखेरीस कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यात 8.50 टक्के व्याज जमा करणार आहे. या महिन्याच्या सुरूवातीस कामगार मंत्रालयाने अर्थमंत्रालयाला 2019-20साठी ईपीएफवर 8.50 टक्के व्याज दर जाहीर करण्यास संमती देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावानुसार डिसेंबर महिन्यात एकरकमी व्याज खात्यावर येणे अपेक्षित आहे. या संदर्भात, आपण आपल्या पीएफ खात्याचा शिल्लक अर्थात पीएफ बॅलेन्स ऑनलाईन किंवा मिस्ड कॉल देऊन मिळवू शकता. चला तर, जाणून घेऊया पीएफ बॅलेन्स तपासण्याची प्रक्रिया काय आहे…
अशा प्रकारे तपासा पीएफ बॅलेन्स
पीएफ बॅलेन्स तपासण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. आपण एसएमएस, मिस कॉल किंवा ऑनलाईन प्रक्रियेद्वारे पीएफ बॅलेन्स तपासू शकता. ईपीएफओ आपल्या ग्राहकांना पीएफचा बॅलेन्स थेट तपासण्याची परवानगी देतो.

एसएमएसद्वारे कळेल पीएफ बॅलेन्स
आपण एसएमएसद्वारे ईपीएफ बॅलेन्स देखील तपासू शकता. बॅलेन्स तपासण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून EPFOHO UAN ENG लिहा आणि 7738299899 या क्रमांकावर हा मेसेज पाठवा. आपल्याला कोणत्या भाषेमध्ये माहिती हवी आहे, हे ‘ENG’ पहिल्या तीन वर्णांवरून निवडता येते. ही मेसेज सुविधा इंग्रजी, हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्ये उपलब्ध आहे .

मिस्ड कॉल प्रक्रिया
यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांचा पीएफ बॅलेन्स जाणून घेता येऊ शकता. यासाठी आपल्याला आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 011-22901406 या क्रमांकावर एक मिस्ड कॉल द्यायचा आहे. यानंतर आपल्या पीएफ खात्याचा तपशील ईपीएफओच्या एसएमएसद्वारे उपलब्ध होतील. यासाठी आपला बँक खाते क्रमांक, पॅन कार्ड आणि आधार कार्ड यूएएनशी लिंक असणे देखील महत्त्वाचे आहे.

ईपीएफओने वित्तीय वर्ष 2019मध्ये पीएफ रकमेवर 8.65 टक्के व्याज दिले होते. तर, आर्थिक वर्ष 2020मध्ये ईपीएफवरील व्याज 8.5 टक्के इतके करण्यात आले आहे. हा गेल्या 7 वर्षातील सर्वात कमी व्याजदर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page