सोशल मीडियवर सावधगिरी बाळगा, कुठल्याही खोट्या मेसेजेसना बळी पडू नका, असं आवाहन एसबीआयने केलं आहे

मुंबई : बँकिंग फ्रॉडच्या  वाढत्या घटना लक्षात घेत देशातील सर्वात मोठी सरकारी बँक ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने  कोट्यवधी खातेधारकांना सावधतेचा इशारा दिला आहे. आपली वैयक्तिक माहिती प्रायव्हेट ठेवण्याची सूचना एसबीआयने  ने ट्विटरवरुन दिली आहे. ही माहिती इतरांसोबत शेअर करताना दोन वेळा विचार करा. तसं केल्यास तुमच्या बँक खात्यातील पैसे सुरक्षित राहतील. बँकिंग फ्रॉड झाल्यास सायबर क्राईमकडे तक्रार नोंदवण्यासही एसबीआयने सांगितलं आहे.
थिंकेश्वर त्यांची वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवतात. नेहमीच ते कुठलीही माहिती इतरांसोबत शेअर करण्याआधी दोन वेळा विचार करतात. कृपया सायबर गुन्ह्यांची तक्रार https://cybercrime.gov.in इथे नोंदवा. कोणासोबतही वैयक्तिक माहिती शेअर करण्यापासून स्वतःला थांबवा. अन्यथा तुमचे बँक अकाऊण्ट रिकामे होईल. तुमचे पॅन  डिटेल्स, INB डिटेल्स, यूपीआय पिन , एटीएम कार्ड नंबर , एटीएम पिन  आणि यूपीआय वीपीए  कोणासोबतच शेअर करु नका, अशा कडक सूचना एसबीआयने दिल्या आहेत.

सोशल मीडियावर सावधगिरी  बाळगा

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ वारंवार आपल्या ग्राहकांना फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी अलर्ट करत असते. एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांना फेक ईमेल्स पाठवले जात असल्याचं बँकेने नुकतंच सांगितलं होतं. त्या ईमेल्सशी एसबीआयचा कोणताही संबंध नाही, असे मेल ओपन करु नका, सोशल मीडियवर सावधगिरी बाळगा आणि कुठल्याही भ्रामक, खोट्या मेसेजेसना बळी पडू नका, असं आवाहन एसबीआयने केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page