पुण्यात कात्रज नवल ब्रिजवर भीषण अपघात

पुण्यात कात्रज नवल ब्रिजवर भीषण अपघात

पुण्यात आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. कात्रज नवल ब्रिज दरम्यान हा अपघात झाल्याचे कळते. ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की,ट्रकने एका रांगेत असलेल्या ८ ते ९ वाहनांना जोरदार धडक दिली आहे. या धडकेमुळे रिक्षा, कार सारख्या छोट्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुर्देवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आज सकाळच्या सुमारास पुण्याच्या कात्रज ते नवल ब्रिज दरम्यान एका भरधाव ट्रकने रिक्षा ट्रकला जोरदार धडक दिली. कात्रज नवल ब्रिज ठिकाणी तीव्र उतार आसल्याने या ठिकाणी असे अपघात सातत्याने घडत असतात. उताराच्या रस्त्यावर मोठ्या वाहनांना बऱ्याचदा ब्रेक कंट्रोल करणे अशक्य होते. त्यामुळे अपघाताचे असे प्रकार वारंवार घडत असतात. गेल्या काही महिन्यातील या मार्गावरील हा तिसरा ते चौथा अपघात आहे.

पुण्यातील कात्रज नवल ब्रिजवर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. असे असले तरी रिक्षा,कार यांसारख्या छोट्या वाहनांने मोठे नुकसान झाले आहे. या रस्त्यावर सतत वाहनांची वरदळ सुरू असते. गेल्या काही महिन्यात या मार्गावर अशाच प्रकारचे काही अपघात झाले होत आहेत.

 

अभिप्राय द्या..