मध्यप्रदेशमध्ये अनेक विचित्र घटना घडत असतात. मध्यप्रदेश राहणाऱ्या एका महिलेने आपल्या दोन मुलांना आधी फाशी देऊन नंतर स्वत: फासावर चडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी संपूर्ण साज शृगांर केला होता. आपल्या दोन्ही मुलांसह महिलेने आपले जीवन संपवले. या विचित्र घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे. मध्यप्रदेशच्या विदिशा जिल्ह्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रूपवती असे या महिलेचे नाव आहे. २८ वर्षांच्या या महिलेने स्वत:सह आपल्या ६ वर्षांच्या आणि ३ वर्षांच्या मुलांचे आयुष्य संपवले.

प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने नववधूप्रमाणे नटली होती. कारण ती सुहासिनी म्हणून या जगाचा निरोप घेणार होती, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. तिघांचेही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची चार महिन्यांपूर्वी डिलीव्हरी झाली होती. तिचे बाळ दोन महिनेच जगले. तेव्हापासून तिचे मानसिक संतुलन बिघडले होते. महिलेचा पती हा ड्रायवर आहे. ही घटना घडली तेव्हा तो ही गावातच होता. महिलेचा आणि तिच्या दोन मुलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलीस या धक्कादायक घटनेचा तपास करत आहेत. महिलेच्या शेजारी राहणारे गावातील लोक, नातेवाईक तसेच तिच्या नवऱ्याचीही पोलीस चौकशी करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page