मनसे व शिवप्रेमी ग्रूप कुडाळ यांच्या कार्यकर्त्यांनी दोघा व्यक्तीना रंगेहाथ पकडून केले. पोलिसांच्या स्वाधीन..
कुडाळ/ –
कुडाळ तालुक्यातील आज आठवडा बाजार असल्याने,आणि त्यात मार्गशीर्ष महिन्यातील पहिला आठवडा बाजार असल्याने कुडाळ येथील बुधवारच्या आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होती,आणि त्यात आज कुडाळ आठवडा बाजारात चरस, गांजा आधी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना रंगेहाथ मनसेच्या व शिवप्रेमी ग्रुपच्या कार्यकत्यांनी या अमली पदार्थाची विक्री करताना पकडले आहे.आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे, मात्र यांचे मुख्य सूत्रधार हे वेगळेच असून अजूनही या मोकाट फिरणाऱ्याना पकडले नाही.येत्या आठ दिवसात चरस गांजा आदी अंमली पदार्थ जिल्ह्यात घेऊन येणारे खरे सूत्रधार पोलिसांनी शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा मनसे कुडाळ पोलीस स्टेशनवर तीव्र आंदोलन मनसेच्या वतीने देण्यात आला पोलिसांना इशारा.कुडाळ मनसे चे तालुका अध्यक्ष श्री.प्रसाद गावडे यांनी दिला आहे.