नाबार्ड योजनेअंतर्गत निधीची तरतूद..

मालवण

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून नाबार्ड योजनेअंतर्गत २०२०-२१ या वर्षाकरिता मालवण तालुकयातील कट्टा एसटी स्टँड ते गुरामवाडी रस्ता ग्रा. मा. ३८० वर किमी ०/९०० मध्ये लहान पुलाच्या बांधकामासाठी १ कोटी २८ लाख,
तर गुरामवाड कुंभारवाडी रस्ता ग्रा. मा. ३०३ वर किमी. ०/०३० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी ५१ लाख २७ हजार एवढ्या निधीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

कुडाळ तालुक्यातील मांडकुली भुईवाडी तेरसे बांबर्डे माळवाडी रस्ता ग्रा. मा. ४३० मध्ये किमी. ०/३०० मध्ये मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी ४ कोटी ५४लाख निधीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
गेली अनेक वर्षे ही पुले बांधण्यासाठी तेथील ग्रामस्थांची मागणी होत होती.
याबाबत आमदार वैभव नाईक यांच्याकडे शिवसेना पदाधिकारी व तेथील ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आ. वैभव नाईक यांनी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून वरील पुलांची कामे मंजूर कऱण्यात आली असून निधीची तरतूद करण्यात आली आहे. या पुलांमुळे अनेक गाव वाड्या जोडल्या जाणार असून नागरिकांना सायीचे होणार आहे. याबद्दल तेथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page