दोडामार्ग 
कसई-दोडामार्ग नगर पंचायतमार्फत चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ऑनलाईन असून स्पर्धेचा कालावधी २१ ते २७ डिसेंबर आहे. स्वच्छ सुंदर परिसर, माझी वसुंधरा, कचरा वर्गीकरण व प्रक्रिया, प्लास्टिक बंदी-काळाची गरज, हागणदारी मुक्त शहर, टाकाऊपासून टिकाऊ, वृक्षारोपणाची गरज, जलसंधारणाचे महत्त्व हे स्पर्धेचे विषय आहेत. स्पर्धेसाठी लहान गट १ली ते ४ थी, मोठा गट ५वी ते १०वी, व खुला गट ११वी पासून पुढे असे तीन वर्ग आहेत. स्पर्धेच्या नियम व अटीचे पालन करून स्पर्धकांनी भाग घ्यावा स्पर्धेचे फोटो व्हिडीओ सिद्धेश शेगले-९३०९१२९३६२ या व्हॉटसअँप नंबरवर अपलोड करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page