प्लाझ्मा थेरपी बाबत आयसीएमआर’चा महत्वपूर्ण अभ्यास धक्कादायक निष्कर्ष.;

प्लाझ्मा थेरपी बाबत आयसीएमआर’चा महत्वपूर्ण अभ्यास धक्कादायक निष्कर्ष.;

नवी दिल्ली /-

कोरोना मुक्त झालेल्या वेक्तींना प्लाझ्मा दिल्याने करोनाचा गंभी0र संसर्ग झालेल्यांचा मृत्यूदर कमी केला जाऊ शकणार नाही, असे भार्तीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात ‘आयसीएमआर’ने म्हटले आहे.अनेक तज्ञांनी केलेल्या अभ्यासाद्वारे हा निष्कर्श काढण्यात आला आहे. देशभरातील 39 सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये 22 एप्रिल ते 14 जुलै दरम्यान या संदर्भातील एक अभ्यास आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये प्लाझ्मा उपचार पद्धतीची परिणामकारकता तपासण्यात आली. एकूण 464 रुग्णांना करोनामुक्‍त झालेल्यांचा प्लाझ्मा देयात आला होता.त्या रुग्णांच्या निरीक्षणाच्या आधारे ‘आयसीएमआर’ने हा निष्कर्श काढला आहे.
कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी देशपातळीवर नियुक्‍त करण्यात आलेल्या ‘नॅशनल टास्क फोर्स’ने ‘आयसीएमआर’च्या या अभ्यासाची पहाणी केली असून त्यास मान्यताही दिली आहे.प्लाझ्मा दात्यांसाठी सोशल मिडीयावरून आवाहन, प्लाझ्माची विक्री, काळाबाजार आणि वाढीव किंमतींना विक्री होण्यावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यातच प्लाझ्माची साठवणूक करण्याची क्षमता देशभरातील फारच कमी रक्तपेढींमध्ये असल्याच्या मुद्‌द्‌याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..