कणकवली /-
मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथे तवेरा कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एक युवक ठार झाला आहे. तर या अपघातात तीन प्रवासी जख्मी झाले आहेत. तवेरा कार मधून ८ प्रवासी गोवा ते कोल्हापूर असा प्रवास आज करत असताना आज पहाडे साडेपाच च्या दरम्याने हा अपघात झाला आहे. गोवा येथून कोल्हापूरला भरधाव जात असलेली तवेरा दुभाजकला धडकून पलटी झाली. यावेळी या कारमधील सुकुमार चौगुले ( २९, कोल्हापूर) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो तरुण ठार झाला असून इतर तीन प्रवासी जख्मी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.