कुडाळ /-
हाॅटेल आर एस एन ते पोलीस स्टेशन परिसरातील रस्त्याच्या साईडची झाडे हटाव मोहीम राबविण्याची मोहीम हाती घेतली हे चांगले असले तरी गेले चार दिवस ज्या प्रकारे पोलीस कुमक घेऊन दिवसाचे काम चालू केले ते योग्य नाही.
हाॅटेल राज कडून वाहतूक व्यवस्था करून जो पर्याय देण्यात आला आहे. तो धोकादायक आहे. आणि त्या धोकादायक रस्त्यावरून अति अवजड वाहनांची ये जा सुरू केली आहे. ती योग्य नसून अत्यंत धोकादायक स्थितीत आहे.त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहिल.
हाॅटेल आर एस एन ते पोलीस स्टेशन पर्यंतचा रस्ता हा मुख्य रस्ता आहे याचे भान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना नाही.जनतेची गैरसोय टाळण्यासाठी मनात आणले असते तर हेच काम राञौच्या वेळीही करता आले असते. पण नेहमीच नकारात्मक भूमिकेचा अवलंब करून योग्य नियोजना अभावी अशा प्रकारची कामे हाती घेऊन जनतेच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार आता पर्यंत सतत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी करत आहेत. हे कुठे तरी थांबणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने यापुढे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी दक्षता घ्यावी असे भावनिक सल्ला कुडाळ. तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष भास्कर परब यांनी दिला आहे.