कुडाळ /-
कला उत्सव हा शिक्षण मंत्रालय भारत सरकार आणि राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य शासनामार्फत युवा कलाकारांसाठी राबविला जात असून गेल्या चार वर्षात जिल्ह्यातील विविध विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कलाप्रकारात सहभाग दाखविला आहे .पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी नाट्य, नृत्य, गायन,वादन या प्रकारात विभाग स्तरावर यश मिळविले आहे. युवा कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून शासनाने ही स्पर्धा नववी ते बारावी या गटासाठी सुरू केली आहे .पाट हायस्कूल मध्ये काळाची पावले ओळखून कै मा. एकनाथजी ठाकूर कलाअकादमी सुरु करण्यात आली यामध्ये पखवाज वादन’ हार्मोनियम वादन, शास्त्रीय गायन ,कथक नृत्य ,चित्रकला, रांगोळीअशा विविध कला प्रकाराचे क्लास सुरु केले आहेत.कुमार सुमन सुनिल गोसावी,शास्त्रीय गायन ,कुमार राज विठोबा कुंभार .त्रिमित चित्र कुमारी सानिका विठोबा कुंभार पारंपारिक नृत्य, कुमारी श्रुतिका आनंद मोरये पखवाज वादन या प्रकारात सहभागी झाले होते. त्यांना जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविण्यात यश मिळाले आहे.
आता राज्यस्तरीय स्पर्धा सावित्रीबाई फुले सभागृह पुणे येथे होणार आहे या त्यांच्या जिल्हास्तरीय यशाबद्दल एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या तसेच माननीय मुख्याध्यापक श्री शामराव कोरे उपमुख्याध्यापक श्री रामचंद्र ठाकुर ,पर्यवेक्षक श्री राजन हंजनकर कलाशिक्षक श्री संदीप साळसकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या सर्व विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशा बद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे पंचक्रोशीतून फार कौतुक होत आहे.