अनैतिक संबंधांचा संशय; तरुणाला ५ जणांनी अडवले अन्…

अनैतिक संबंधांचा संशय; तरुणाला ५ जणांनी अडवले अन्…

पुण्यात भररस्त्यात एका तरुणाला अडवून त्याच्यावर पाच जणांनी कोयत्याने वार केले. जांभूळवाडी येथे हा प्रकार घडला. अनैतिक संबंधांच्या संशयातून ही घटना घडली. तरूण जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

 पुणे अनैतिक संबंधाच्या संशयावरून पाच जणांनी तरुणाला अडवून त्याच्यावर कोयत्याने वार केले. हा प्रकार जांभूळवाडी येथे घडला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

किरण कैलास इंगळे (वय २२), शेखर अंकुश दिघे (वय २०) आणि जय पांडुरंग निकम (वय २१, तिघे रा. विठ्ठलनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अजित ओंबासे (वय ३४, रा. आंबेगाव खुर्द) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार अजित यांचा भाऊ अमर हा दुचाकीवरून रविवारी मार्केट यार्ड येथे जात होता. त्या वेळी जांभूळवाडी रोडवरील लिपाणे वस्ती येथे पाच जण कारमधून आले. त्यांनी अमरच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडले.

अमर एका महिलेबरोबर बोलत असल्याच्या संशयावरून आरोपींनी त्याला शिवीगाळ करून त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक अर्जुन बोत्रे तपास करत आहेत.

 

अभिप्राय द्या..