राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त फोंडाघाट येथे पार पडले रक्तदान शिबिर

कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्याने आज नंदुरबार जिल्ह्याशी रक्ताचे नाते जोडले आहे. आमच्या जिल्ह्यातील रक्त आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील रोग्याचे प्राण वाचविण्यासाठी चाललंय याचा मला अभिमान वाटतोय. रक्तदानातून आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आपण दिलेल्या शुभेच्छा या देखील आमच्यासाठी अभिमानास्पद आहेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर आणि कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आजमारुती निवास, नवीन कुर्ली, फोंडाघाट या ठिकाणी रक्तदान कार्यक्रम पार पडला यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी घोगळे, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, पदवीधर सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मेस्त्री, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष नाजीरभाई शेख, प्रांतिक सदस्य विनोद मर्गज, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राधानगरी तालुकाध्यक्ष किसन चौगुले, कणकवलीचे पक्ष निरीक्षक सावळाराम अनावकर, सुंदर पारकर, डॉ अभिनंदन मालंडकर, मंगेश दळवी, सागर वारंग, निसार शेख, संदेश मयेकर, विष्णु पिळणकर आदी उपस्थित होते.

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले शरद पवार यांनी कृषी क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या योगदानातून कोकणातही कृषी क्रांती घडली आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेले रक्तदान शिबीर निश्चितच राज्यातील गरजु लोकांना अत्यंत उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले.

कोरोना आणि रक्त माणसाला माणुसकी शिकवतात, ते भेदभाव करत नाहीत. जातीयता ही अलीकडच्या काळातली गोष्ट आहे. रक्त हे माणसाला जीवन देत. त्याचे कारखाने कुठेच नाहीत. त्यामुळे रक्तदान करण अत्यंत गरजेचे आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांनी सांगितले. आज महाराष्ट्रातील दुसऱ्या टोकाला असलेल्या नंदूरबार जिल्ह्याला आम्ही आज रक्त पाठवत आहोत. रक्ताने आज सिंधुदुर्ग आणि नंदुरबार या दोन टोकाच्या जिल्ह्यांना जोडलं आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळो बोलताना अनंत पिळणकर यांनी उपस्थितांना शुभेच्छा देताना या पुढच्या काळात जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांच्या मार्गदर्शनानुसार काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसानी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page