एमएक्स प्लेअर (MX Player)वरील वेबसीरिज ‘आश्रम’मध्ये मुख्य भूमिकेत असलेला बॉबी देओल आणि निर्मिता प्रकाश झा या दोघांना जोधपुर कोर्टाने नोटीस बजावली आहे. याबाबतची सुनावणी ११ जानेवारी होणार आहे. प्रकाश झाची ‘आश्रम’ ही वेबसीरिज प्रदर्शित होण्यापूर्वी पासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या वेबसीरिजचा दुसरा सीझन ‘आश्रम चॅप्टर-२ द डार्क साईड’ ११ नोव्हेंबरला एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाला होता. या वेबसीरिजचे दोन्ही सीझन चांगलचे चर्चेत आले होते.
‘आश्रम’ या वेबसीरिजमध्ये अभिनेता बॉबी देओलने एका धर्मगुरुची भूमिका साकारली आहे. या वेबसीरिजमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, यामुळे सोशल मीडियावर वेबसीरिज विरोधात एक कॅम्पन चालवले गेले होते. तसेच गेल्या महिन्यात ‘आश्रम’ वेबसीरिज विरोधात करणी सेना प्रदेश संघटनेचे महामंत्री सुरजीत सिंह यांनी लीगली नोटिस पाठवली होती. तसेच वेबसीरिजमधील काही दृश्यांवरून नाराजी व्यक्त केली होती.
जेव्हा या वेबसीरिजचा पहिला टीझर प्रदर्शित केला होता, तेव्हा देखील ‘आश्रम’वर अनेक आरोप करण्यात आले होते. पहिल्या सीझननंतर सोशल मीडियावर लोकांनी प्रचंड राग व्यक्त केला होता. ‘आश्रम’ या वेबसीरिजची कथा काल्पनिक आहे. कोणाची भावना दुखवण्याची नाही आहे. या वेबसीरिजमधला काल्पनिक बाबा दाखवला गेला आहे, असे ‘आश्रम’ वेबसीरिजकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तरी देखील ‘आश्रम’ वेबसीरिज विरोधातील वाद सुरुच आहे.
‘आश्रम’ वेबसीरिजमध्ये बाबा निरालाची भूमिका बॉबी देओने केली आहे. बॉबी देओल व्यक्तिरिक्त आदिती पोहनकर, चंदन रॉय सान्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, अध्ययन सुमन हे सर्व कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.