रेडी हायस्कुल च्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न

रेडी हायस्कुल च्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न

वेंगुर्ला
विद्यार्थी घडविणारे मंदिर उभे करणे हो सोपी गोष्ट नाही. शिक्षण क्षेत्रात असे उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रत्येक संस्थांना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व आपण मदत केली. यामागचा एकच उद्देश की यातून चांगला विद्यार्थी घडला पाहिजे. तर पुढे हेच लोक आपल्या गावात पैसा आणून गावचा विकास करणार. अतिशय उत्तम काम या रेडी गावात श्री माऊली विद्यामंदिर रेडी करीत आहे. या पुढेही ज्यावेळी गरज पडेल त्या वेळी मी तुमच्या मदतीला असेल, असे प्रतिपादन माजी खासदार निलेश राणे यांनी रेडी येथे केले.
श्री माऊली विद्यामंदिर रेडी हायस्कुलच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी इमारत बांधकामासाठी खासदार निधीतून सुमारे २५ लाख रुपये जाहीर केले होते. या आश्वासनाची पूर्तता झाल्यामुळे त्या निधीतून ही इमारत साकारणार आहे. दरम्यान रेडी येथील श्री माऊली देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधून या इमारतीचा भूमिपूजन सोहळा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. प. अध्यक्षा समिधा नाईक, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, मनीष दळवी, वि. स. खांडेकर प्रतिष्ठानच्या संचालिका सुवर्णलता महाले, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जि. प. सदस्य प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग राणे, पं. स. सदस्य मंगेश कामत, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, संस्था सदस्य अजित सावंत आदी उपस्थित होते. यावेळी जि. प. सदस्य प्रितेश राऊळ तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गोसावी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तर मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील यशस्वी विध्यार्थ्यांचा भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना राजन तेली म्हणाले की, विद्यालय महाविद्यालयात कोणत्याही सोई, सुविधा कमी पडू नये, मुलांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देधाने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी हा भरघोस निधी दिला. रेडी गावात चांगली पर्यटन स्थळे आहेत. गावाने एकत्र येऊन पर्यटनाच्या दृष्टीने काय करता येईल याकडे लक्ष द्यावे, आणि आपल्या गावाची उन्नती करावी.
यावेळी ग्रा. पं. सदस्य आनंद भिसे, गायत्री सातोस्कर, राणी नरसुले, विनोद नाईक, माजी विद्यार्थी तथा माजी पं. स. सदस्य चित्रा कनयाळकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, समीर कुडाळकर, विजय रेडकर, नितीन चव्हाण, प्रणव वायंगणकर, लक्ष्मीकांत कर्पे, जगन्नाथ राणे, भूषण सारंग, सागर राणे, आबा राणे, संदेश राणे, पुरुषोत्तम राणे, उल्हास नरसुले, सिद्धेश जोशी, नंदकुमार मांजरेकर, स्नेहल राऊळ, गोट्या राऊळ आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..