वैभववाडी शहरात सत्ताधारी नगरसेवकांकडून बोगस मतदार नोंदण.;मनसेचे तहसीलदार वैभववाडी यांना निवेदन..

वैभववाडी शहरात सत्ताधारी नगरसेवकांकडून बोगस मतदार नोंदण.;मनसेचे तहसीलदार वैभववाडी यांना निवेदन..

वैभववाडी/-

वाभवे – वैभववाडी नगर पंचायतीचे सत्ताधारी नगरसेवक आपल्या सोईच्या प्रभागात बोगस मतदार नोंदणी करत आहेत.तसेच तालुक्यातील अन्य गावातील मतदारांना वैभववाडी नगरपंचायत हद्दीमध्ये मतदार नोंदणी केली जात आहे. या बाबत वैभववाडी तालुका मनसेच्या वतीने वैभववाडी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

शासनाच्या मतदार नोंदणी अभियानाचा गैरफायदा घेऊन होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी स्थानिक सत्ताधारी नगरसेवक मोठ्या प्रमाणात आरक्षित असलेल्या भागातील वर्षानुवर्ष वास्तव्यास असलेल्या मतदारांना पैशाचे आमिष दाखवून आपल्या सोयीच्या विभागात बोगस पद्धतीने मतदार नोंदणी केली जात आहे.नोंदणी केले जात असलेले मतदार वैभववाडी शहरातील रहिवासी नाहीत,त्यांना हाताशी धरून खोट्या सह्या मारून मतदार नोंदणीचा बोगस प्रकार सुरू आहे.आरक्षित झालेल्या विभाग आज कमी होताना जाणवत आहे पायी घर मालकाला हाताशी धरून कोठे भाडेकरार करून त्यांच्या असेसमेंट च्या आधारे बोगस मतदार नोंदणी करीत आहे इतर गावातूनही मोठ्या प्रमाणात मतदारांची नोंदणी केली जात आहे. 14 व 15 डिसेंबर या दोन दिवसात वैभववाडी नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अशी बोगस मतदार नोंदणी होणार आहे अशी माहिती मिळाली आहे .शासकीय कर्मचारी अशा बोगस कामांना खतपाणी घालताना दिसत आहेत.आपण अशा कर्मचाऱ्यांना योग्य समज द्यावी, मनसेने च्या वतीने योग्य त्या न्यायालयात दाद मागणार आहोत. वैभववाडी शहरातील नागरिकांना या सर्व गोष्टीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथील सुज्ञ व प्रतिष्ठित नागरिकांनी याबाबत आपल्याकडे होत असलेल्या गैर प्रकाराबाबत खंत व्यक्त केली आहे . तरी आपण जातीने लक्ष घालून पारदर्शक काम करण्यात यावे, योग्य प्रकारे मतदार नोंदणी करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना योग्य ते पाऊल उचलले असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी वैभववाडी मनसे तालुकाध्यक्ष सचिन तावडे, उपाध्यक्ष दीपक पार्टे,मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष रुपेश वारंग, विनोद विटेकर ,दिनकर डफळे ,अजय शिंदे ,रवींद्र डफळे, अमित मांजलकर ,चंद्रकांत पार्टे आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..