शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन कुर्ली मध्ये उद्या रक्तदान शिबिर..

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन कुर्ली मध्ये उद्या रक्तदान शिबिर..

रक्तदान करा आणि देशकार्याला हातभार लावा, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचे आवाहन

कणकवली/ –

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने मारुती निवास, नवीन कुर्ली, फोंडाघाट याठिकाणी मंगळवार दिनांक 15 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत “महारक्तदान शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात कार्यकर्त्यांनी अनमोल असलेले रक्तदान करावे आणि अनेकांचे जीव वाचविताना देश कार्यात हातभार लावावा असे आवाहन राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले आहे.

या शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, कणकवली तालुका आय काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी घोगळे, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सुंदर पारकर, डॉ अभिनंदन मालंडकर, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रपुल सुद्रीक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हे शिबीर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन कुर्ली, फोंडाघाट याठिकाणी 15 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत “महारक्तदान शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..