आचरा /-

कोरोना महामारीत बंद असलेले आचरा हायस्कूल लवकरच सुरू होणार असून या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले हॅंडवाॅश आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि न्यू इंग्लिश स्कूल स्थानिक स्कूल कमेटी सदस्य अर्जुन बापर्डेकर यांनी मुख्याध्यापक गोपाळ परब यांच्या कडे सुपूर्द केले.
यावेळी त्यांच्या सोबत आचरा व्यापारी संघटनेचे जयप्रकाश परूळेकर, निखिल ढेकणे, इंग्लिश मिडीयम स्कूल चे खजिनदार आणि व्यापारी संघटनेचे कार्यकारिणी सदस्य परेश सावंत,स्कूल कमेटी सदस्य शंकर मिराशी, संजय पाटील तसेच सदानंद घाडी, बाबू मेस्त्री, अनिरुद्ध आचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना म्हातारीच्या पार्श्वभूमिवर ९महिन्यांच्या विश्रांती नंतर शासन निर्णयानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. पालकांच्या विरोधामुळे न्यू इंग्लिश स्कूल आचरा सुरू झाले नव्हते.आता पालकांच्या आग्रहानुसार धी आचरा पीपल्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार या आठवड्यात आचरा हायस्कूलचे इयत्ता दहावी चे वर्ग सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवत सुरू केले जाणार आहेत.स्थानिक स्कूल कमेटी अध्यक्ष निलिमा सावंत तसेच इतर कमेटी सदस्य यांच्या सोबत शिक्षकांच्या झालेल्या बैठकीत या बाबत नियोजन करण्यात आले होते. या दृष्टीने सुरक्षेसाठी आवश्यक हॅंडवाॅश ची शाळेची गरज लक्षात घेऊन आचरा व्यापारी संघटनेच्या माध्यमातून आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि स्थानिक स्कूल कमेटी सदस्य अर्जुन बापर्डेकर यांनी हॅंडवाॅश मुख्याध्यापक परब यांच्या कडे सुपूर्द केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page