वेंगुर्ला /-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे १६ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० वा. वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामिण कार्यालय येथे सदस्य नोंदणी व बुथ कमिट्या स्थापन करण्यात येणार आहेत. सदस्य नोंदणी व बुथ कमिट्यां स्थापनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे
उद्घाटन माजी राज्यमंत्री प्रविण भोसले,जिल्हाध्यक्ष अमित सामंत , प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर आदी उपस्थित रहाणार आहेत. यावेळी सहभागी होणाऱ्या महिलांसाठी पैठणी व पुरूषांसाठी शर्ट-पॅन्ट पीस लॉटरी सोडत पद्धतीने उपस्थित प्रत्येक गावा गावात नोंदणी करण्यात आलेल्या बुथ कमिट्यां सदस्या मधू्न लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला वेंगुर्ला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामिण क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बुथ सदस्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रसाद चमणकर यांनी केले आहे.