बोगस मतदार नोंदणी बाबत भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तहसीलदार वेंगुर्ले यांचे कडे तक्रार

बोगस मतदार नोंदणी बाबत भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तहसीलदार वेंगुर्ले यांचे कडे तक्रार

वेंगुर्ला /-

मा.भारत निवडणुक आयोगाने दि.१ जानेवारी २०२१ या अह्रर्ता दिनांकावर आधारित राज्यातील सर्व विधानसभा मतदार याद्यांचा पुररिक्षणाचा कार्यक्रम घोषित केला होता.सदर कार्यक्रम अंतर्गत दिनांक १७ नोव्हेंबर २०२० ते १५ डिसेंबर २०२० या कालावधीत नाव नोंदणी संदर्भाचे दावे व हरकती स्वीकारण्याची मुदत दिलेली होती. या कालावधीत मतदार नोंदणी संबंधाने विशेष मोहीम राबविण्याचे आदेश आयोगाने दिले होते.परंतु हि नवीन नाव नोंदणी करताना आवश्यक पुरावे हवे असताना संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यावर राजकीय दबाव आणून खोटे रहिवासी दाखले देऊन सदर प्रकरणे जबरदस्तीने सादर केलेली आहेत. अशा प्रकारे जी बोगस नाव नोंदणी केलेली आहे त्याची खातरजमा करून सदर मतदार नोंदणी रद्द करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार प्रविणकुमार लोकरे यांचेकडे भाजपा शिष्टमंडळाने केली.यावेळी तहसीलदार प्रविणकुमार लोकरे यांनी भाजपा शिष्टमंडळास सांगितले की, अशा चुकीच्या पद्धतीने मतदार नोंदणी केलेली असेल व त्यावर हरकत घेतली असेल तर त्यांची शहानीशा करुन सदर मतदार नोंदणी रद्द करण्यात येईल.यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, नगरसेवक प्रशांत आपटे , नगरसेविका श्रेया मयेकर,नगरसेवक धर्मराज कांबळी , ता.उपाध्यक्ष दिपक नाईक,युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, बुथप्रमुख शेखर काणेकर,ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, अल्पसंख्याक सेलचे रफिक शेख, युवा मोर्चा चे निलय नाईक – सुजय गांवकर – सिध्देश मेस्त्री तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..