वेंगुर्ला /-
वेंगुर्ले कॅम्प म्हाडा वसाहत लगतच्या ठिकाणी राहणारे लवू नारायण गावडे यांची तेथे असलेली मारूती सुझुकी स्वीफ्ट कार नं. एम.एच.-०७-जी.-७६७१ हि कार दि. १२ डिसेंबर रात्रौ ९ ते १३ डिसेंबर पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारांस आग लागून जळून खाक झाली. या प्रकरणी लवू गावडे यांनी वेंगुर्ले पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार जळीत म्हणून वेंगुर्ले पोलीस स्थानकात नोंद झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शहराचे पोलीस बीट अंमलदार डी.बी पालकर हे करीत आहेत.