मोबाईलवर ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या इयत्ता आठवीतील अल्पवयीन मुलीला झुम ऍपवर अश्लील मेसेज आले असून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल जात असल्याचा गंभीर प्रकरण समोर आलं आहे. हा सर्व प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, जास्तच प्रकरण वाढत असल्याने अखेर मुलीच्या आईने भोसरी एमआयडिसी पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. दरम्यान, मुलीसंबंधी तिचे वडील आणि मुख्यद्यापकांच्या मेलवर देखील अश्लील मेसेज असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोना महामारीमुळे शालेय विद्यार्थी हे ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मात्र, अश्याच ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या इयत्ता आठवीतील मुलीला अश्लील मेसेज आले असून जीवे मारण्याची धमकी झूम ऍपवर आली आहे. तसेच अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल जात असल्याच पोलिसांनी सांगितले आहे. अल्पवयीन मुलगी ऑनलाइन शिक्षण घेत असताना हा गंभीर प्रकार घडत आहे. माझा माणूस तुझ्याकडे पाठवतो, तू जर आली नाहीस तर जीवे मारेल, अन्यथा तू आत्महत्या कर असे झूमवर मेसेज संबंधित अल्पवयीन मुलीला केले जात आहेत. या प्रकरणामुळे पालक भीतीच्या सावटाखाली आहेत.

गंभीर बाब म्हणजे, अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या आणि ज्या शाळेत मुलगी शिक्षण घेत आहे तेथील मुख्याद्यापक यांच्या मेलवर देखील मुलीसबंधी अश्लील मेसेज आल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी शाळा प्रशासनाने सर्व पालकांची आणि मुलांची बैठक घेऊन अस कोणा संबंधी घडल्यास तात्काळ पुढे याव अस म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी भोसरी एमआयडिसी पोलीस करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page