देशातली सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीने मारूती सुजुकी इंडियाने आपल्या सात सीटर कारला सर्वात कमी किंमतीमध्ये बाजारात लॉंच केले आहे. अवघ्या ३९० रूपयांच्या आकर्षक अशा EMI वर ही कार खरेदी करता येणार आहे. मारूती सुजुकी इंडियाच्या सर्वात लोकप्रिय कारपैकी एक अशा एर्टिगा कारचे मॉडेल कंपनीने अत्यंत स्वस्त अशा EMI वर ग्राहकांना देऊ केले आहे. त्यामुळे ग्राहकांना सर्वात स्वस्त अशा किंमतीतली कार घरी घेऊन जाण्याची संधी मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे या कारमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने ड्युएल एअरबॅगची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे स्वस्त कार उपलब्ध करून देतानाच ग्राहकांच्या सुरक्षिततेचा सर्वात जास्त विचार यामध्ये करण्यात आले आहे.

 

असे आहेत कारचे स्पेसिफिकेशन
एर्टिगाची पेट्रोल इंजिनची कारची ९२ हॉर्सपॉवर इतकी क्षमता आहे. तर डिझेल इंजिनच्या कारची ९० एचपी पॉवर आहे. दोन्ही इंजिन ५ स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्ससोबत येतात. पेट्रोल इंजिनमध्ये ४ स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्सचा पर्यायही आहे. तसेच नवीन मारूती एर्टिगाच्या झेड प्लस व्हेरिएंट मॉडेलमध्ये मारूतीचा स्मार्टप्ले इंफोनटेनमेंट सिस्टिम आहे. ही सिस्टिम एंड्रॉईड, ऑटो, एपल कारप्ले आणि नेव्हीगेशन सपोर्टसोबत येते.

कारमध्ये कॅमेरासोबतच रियर पार्किंग सेंसर, ऑटोमॅटिक क्लाइमेंट कंट्रोल, पुश बटन स्टार्ट – स्टॉप, १५ इंची अलॉय व्हिल, हाय एडजेस्टेबल ड्रायव्हर सीट देण्यात आली आहे. या सीटमुळे लॉंग ड्राईव्हमध्ये ड्रायव्हरला आराम मिळतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने कारमध्ये ड्युएल एअरबॅग आणि एबीएस वेरिएंट दिला आहे. मारूतीने आपल्या ग्राहकांसाठी सबस्काईब्रर प्रोग्रामची घोषणा केली आहे. त्यानुसार या कार्यक्रमाचा विस्तार हा मुंबई, अहमदाबाद, गांधीनगर यासारख्या शहरात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या तीन दिवसांमध्ये ६० शहरात सबस्क्राईबर कार्यक्रमाचा विस्तार होणार आहे.

इतक आहे डाऊन पेमेंट, असा मोजावा लागेल EMI
एर्टिगा LXI या कार मॉडेलची किंमत ही ७.५९ लाख रूपये इतकी आहे. या कारसाठी एक लाख रूपये इतका डाऊन पेमेंट केल्यास महिन्यापोटी ११ हजार ७२१ रूपये इतका EMI मोजावा लागेल. महिन्यापोटीच्या EMI हा प्रत्येक दिवसासाठी मोजला तर दिवसाचे ३९० रूपये तुम्हाला कारसाठी मोजावे लागतील. त्यामुळे आपल्या कुटुंबातील नवीन सदस्यांमध्ये या बजेट कारचा आणि स्वस्त EMI चा पर्याय वापरायला हरकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page