प्रेमाला विरोध करणाऱ्या आजीसह नातवाचा खून करुन स्वत: नंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे.
प्रेमासाठी वाटेल ते करण्याची बऱ्याच जणांची तयारी असते. मग प्रेमाकरता एखादी व्यक्ती कोणत्याही थराला जाते. असाच एक धक्कादायक प्रकार नागपुरमध्ये घडल्याचे समोर आले आहे. प्रेमाला विरोध करणाऱ्या आजीसह नातवाचा खून करुन स्वत: नंतर आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्यहत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
नेमके काय घडले?
नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात दुहेरी हत्याकांड घडल्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्यातील हजारीपहाड भागात ७० वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे, १० वर्षीय यश धुर्वे आणि त्यांची नात एकत्र राहत होते. तिचे आरोपी मोईन खानसोबत प्रेमप्रकरण होते. मात्र, आजीचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. त्यामुळे चिडून मोईन खानने लक्ष्मीबाई दुर्वे (७०) आणि यश धुर्वे (१०) यांची हत्या केली होती. याप्रकरणी आरोपी मोईन खानवर पोलिसांनी संशय व्यक्त करत त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, आरोपी फरार असल्याने सुरुवातीला त्याचा लागला नाही.
दरम्यान, शोध घेत असताना मोईन खानने आत्महत्या केल्याचे समोर आले. या आरोपीने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. मात्र, याचे कारण अद्याप अजूनही गुलदस्त्यात असून मोईन खानच्या आत्महत्येने सध्या वेगळे वळण मिळाले आहे. त्याने ही आत्महत्या का केली असावी याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तसेच, याप्रकरणी पोलिसांनी आत्यहत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.