Arundhati Gold Scheme : मुलींच्या विकासासाठी, त्यांच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी तसंच त्यांना आर्थिक हातभार देण्यासाठी आसाममध्ये अरुंधती सुवर्ण योजना अत्यंत उल्लेखनीय ठरतेय.
नवी दिल्ली : आपल्या मुलीचा विवाह मोठ्या थाटामाटात व्हावा, अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. यासाठी अगदी सुरुवातीपासूनच आई-वडील मुलींच्या विवाहासाठी पै न पै गोळा करताना दिसतात. अशाच पालकांना आणि मुलींना मदत करण्यासाठी आसाम सरकारनं एक नवी योजना सुरू केलीय. आसाम सरकारनं अरुंधती गोल्ड स्कीम (Arundhati Gold Scheme) नावाच्या योजनेचा शुभारंभ केलाय. या योजनेंतर्गत मुलींना विवाहात सरकारकडून १० ग्रॅम सोनं भेट म्हणून देण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागणार?
– अरुंधती सुवर्ण योजनाचा लाभ अशा कुटुंबांना घेता येईल ज्यांना एक किंवा दोन मुली आहेत.
– तीन किंवा त्यांहून अधिक मुली असतील तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
– या योजनेचा लाभ तेव्हाच घेता येईल जेव्हा विवाहावेळी मुलीचं वय १८ वर्षांहून अधिक आणि मुलाचं वय २१ वर्षांहून अधिक असेल.
– योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांचं वार्षिक उत्पन्न ५ लाखांहून कमी असायला हवं. त्याहून अधिक उत्पन्न असल्यास या योजनेचा फायदा मिळणार नाही
आसाम सरकारच्या या योजनेचं कौतुक देशभर होतंय. मुलींच्या विकासासाठी, त्यांच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी तसंच त्यांना आर्थिक हातभार देण्यासाठी या योजनेचा मोठी मदत होऊ शकेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला शासनाकडे माहितीसह एक अर्ज दाखल करावा लागणार आहे. आसाम सरकारकडून गेल्या वर्षी ही योजना सुरू केली होती.
राज्य सरकारच्या या योजनेचा आर्थिकदृष्या कमकुवत असणाऱ्या कुटुंबांना होणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे इच्छा असूनही मुलींना मदत न करू शकणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल. सरकारकडून मुलींसाठी अनेक योजना राबवण्यात येतात. यातील शिक्षणाच्या सुविधांचा अधिकाधिक फायदा या माता-पित्यांना घेता येईल. तसंच मुलींच्या विवाहाच्या वेळी सरकारकडून १० ग्रॅम सोनंही मिळेल.