काळसे हायस्कूलला कोरोना प्रतिबंधक साहित्य प्रदान दिनदर्शिका प्रकाशन; माजी विद्यार्थी सेवा संस्थेचा उपक्रम..

काळसे हायस्कूलला कोरोना प्रतिबंधक साहित्य प्रदान दिनदर्शिका प्रकाशन; माजी विद्यार्थी सेवा संस्थेचा उपक्रम..

 

 

श्री शिवाजी विद्यामंदिर काळसेच्या माजी विद्यार्थी सेवा संस्थेच्या वतीने मंगळवार दिनांक ८ डिसेंबर रोजी शाळेला मास्क , सॅनिटायजर, थर्मल गन , ऑक्सिमीटर इत्यादी कोरोना प्रतिबंधक साहित्य मुख्याध्यापक किशोर वालावलकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. आज शुक्रवार ११ डिसेंबर रोजी काळसे हायस्कूल ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरू झाल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मास्क सॅनिटायजर आदी साहित्याची गरज होती. ही गरज ओळखून माजी विद्यार्थी सेवा संस्था मुंबई च्या वतीने सदर कोव्हीड १९ प्रतिबंधक साहित्य प्रशालेला देणगी स्वरूपात मोफत उपलब्ध करून देण्यात आले.

यावेळी माजी विद्यार्थी सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री विनोद गोसावी , सचिव संतोष गुराम , प्रकाश प्रभु , संस्थापक चंद्रकांत दळवी , प्रमुख पाहुणे बदलापूर शिवसेना शहर विभाग प्रमुख संदिप परब , काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. अर्चना प्रभु, सेक्रेटरी केशव सावंत , दाजी परब, विजय चव्हाण , राजन प्रभु , सुवर्ण काळसेकर , योगेश राऊळ , जयवंत केळुस्कर , अनंत परब , दीपिका म्हापणकर, जयप्रकाश नाईक आदी मान्यवर तसेच माजी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.

दिनदर्शिकेचे केले प्रकाशन गेली १२ वर्षे कार्यरत असलेली माजी विद्यार्थी सेवा संस्था विविध शैक्षणिक , वैद्यकीय आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत असतानाच गेली तीन वर्षे दिनदर्शिका छापण्याचेही काम करत आहे. त्या अनुषंगाने दिनदर्शिका सन २०२० /२१ च्या माजी विद्यार्थी सेवा संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष विनोद गोसावी उपजिल्हाधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सेवानिवृत्तीपर सत्कारही यावेळी करण्यात आला आणि प्रमुख पाहुणे संदिप परब यांचाही संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला.

अभिप्राय द्या..