​​विद्यार्थी वाहतूक क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत असलेले स्कूलबसचालक सध्याच्या करोनाकाळात मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. एप्रिलपासून स्कूलबसची फी मिळालेली नाही, शाळा कधी सुरू होणार, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

विद्यार्थी वाहतूक क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत असलेले स्कूलबसचालक सध्याच्या करोनाकाळात मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. एप्रिलपासून स्कूलबसची फी मिळालेली नाही, शाळा कधी सुरू होणार, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. राज्य सरकारकडून मदत तर दूरच; पण साधा प्रतिसादही मिळत नाही. यामुळे १५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघातर्फे घेण्यात आला आहे.

 

स्कूलबसवर चालकांसह महिला आणि पुरुष मदतनीस असतात. बस बंद असल्याने अनेकांचे रोजगार पूर्णपणे बुडाले आहेत. आर्थिक संकटाचा सामना करीत असलेले अनेकजण मिळेल ते काम करत जगत आहेत. अशातच कर्जफेडीसाठी बसमालकांच्या पाठी वित्तीय संस्थांनी तगादा लावला आहे. या अडचणीच्या काळात सरकारने या घटकाकडेही तातडीने लक्ष देणे गरजेचे असताना, सरकार मात्र दुर्लक्ष करत आहे. यामुळे शालेय बस मालक उद्ध्वस्त झाले आहेत. वित्तीय संस्थाकडून होणारा छळ रोखण्यासाठी स्कूलबस मालकांसोबत मनसे कायम आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी सांगितले.

१६ मार्च २०२० पासून स्कूलबस वाहतूक बंद आहे. सध्याची स्थिती पाहता, जून २०२१ पर्यंत शाळा बंद राहण्याची चिन्हे आहेत. आता बँका, वित्तीय कंपन्यांनी बसमालकांकडे कर्जफेडीसाठी तगादा लावला आहे. परिवहन खात्याकडे टप्पा वाहतुकीला परवाने मागितले, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद नाही. एकीकडे आर्थिक मदत करायची नाही, दुसरीकडे प्रवासी वाहतुकीचा व्यवसायही करू द्यायचा नाही, अशी दुहेरी कोंडी सरकारने केली. यामुळे अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघातर्फे १५ डिसेंबरला आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार आहे. यात चालकांसह महिला व पुरुष मदतनीस ही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विद्यार्थी वाहतूक महासंघाच्या योगेश कांबळे यांनी दिली.

‘एसटीप्रमाणेच मदत द्या’ महासंघाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, केंद्रीय मंत्री यांना अनेक निवेदने दिली. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सरकारने एसटी महामंडळाला जशी आर्थिक मदत केली, तशी मदत स्कूलबस चालकांना, मदतनीसांना मिळावी, अशी अपेक्षा ही महासंघाने व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page