तैमुरच्या नावावर झालेला वाद, दुसऱ्या बाळाच्या नामकरणावर ‘सैफिना’चा अनोखा उपाय  

तैमुरच्या नावावर झालेला वाद, दुसऱ्या बाळाच्या नामकरणावर ‘सैफिना’चा अनोखा उपाय  

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर- खानने तिचा पहिला मुलगा तैमूर अली खानच्या नावावरून बराच वादंग झाल्याचं सांगितलं. आता तिने आपल्या दुसर्‍या बाळाच्या नावासाठी केलेल्या योजनेबद्दल सांगितलं आहे.

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर लवकरच बाळाला जन्म देणार आहे. ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ती आपल्या दुसर्‍या बाळाला जन्म देईल. करीना कपूरचे चाहते या गोड बातमीची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि तिच्या बाळाचं नाव जाणून घेण्याचीही त्यांना इच्छा आहे. दरम्यान आता अभिनेत्रीने आपल्या बाळाच्या नावाच्या प्लॅनिंगबद्दल सांगितलं आहे.

करिना कपूरने चॅट शोमध्ये केला दुसऱ्या बाळाच्या नावाचा खुलासा

करिना आणि सैफने जेव्हा पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं होतं तेव्हा त्या नावाचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. अनेक महिने या नावाचा वादंग सुरू होता. आता तिने आपल्या दुसर्‍या मुलाच्या नावासाठी केलेल्या योजनेबद्दल सांगितलं आहे. एका चॅट शोमध्ये करिना म्हणाली की तैमूरच्या नावावर झालेल्या वादानंतर मी आणि सैफने दुसऱ्या बाळाच्या नावाचा विचार करणं सोडून दिलं आहे. नाव ठेवण्याची गोष्ट आम्ही शेवटच्या वेळेला ठेवली आहे.

करिना कपूरने सप्टेंबरमध्ये दिली गरोदर असल्याची बातमी

सप्टेंबरमध्ये करिना कपूर आणि सैफ अली खानने एक निवेदन शेअर करत म्हटलं की, ‘आमच्या कुटुंबात आणखी एका सदस्याची वाढ होणार आहे हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. सर्व प्रियजनांचं प्रेम आणि सहकार्याबद्दल धन्यवाद.’

करिना आणि सैफचे आगामी प्रोजेक्ट

करिनाच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमातील तिच्या भागाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. या सिनेमात तिच्यासोबत आमिर खान दिसणार आहे. तर सैफ अली खाननेही ‘भूत पोलीस’ सिनेमाचं चित्रीकरण संपवलं आहे.

अभिप्राय द्या..