कसाल येथे नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ..

कसाल येथे नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ..

 

कसाल येथील बालवाडी येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल नळ पाणीपुरवठा योजना कामाचा शुभारंभ कसाल सरपंच सौ. संगीता परब यांच्या हस्ते करण्यात आला. या नळपाणीपूरठा योजनेमुळे कसाल बालमवाडीतील अनेक वर्ष असलेला पाणी टंचाईचा प्रश्न मिटणार आहे. पाण्याची टाकी बांधून या टाकीवरून नळयोजना करण्यात येणार आहे.यावेळी कसाल पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर, उपसरपंच दत्ताराम सावंत, कसाल ग्रामविकास अधिकारी सौ. एस.बी. कोकरे, रामराव परब, भगवान बालम, मोहन राणे, भिवाजी परब, भालचंद्र बागवे, दक्ष पटेल, विनय राणे, बाळकृष्ण सावंत आदी सह कसाल बालवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..