कुडाळ येथील उद्योजकाला अज्ञात व्यक्तींकडून अपहरण करण्याचा प्रयत्न.;कुडाळ शहरात खळबळ

कुडाळ /-

कुडाळ एमआयडीसी येथून एका उद्योजकाला अज्ञात व्यक्तींनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कुडाळ शहरात खळबळ उडाली आहे.याबाबत कुडाळ पोलिसांनी जलदगतीने केलेले प्रयत्‍न यामुळे यातील अपहरण केलेल्या व्यक्तीसह 3 व्यक्तींना एका गाडीसह फोंडा येथे पकडण्यात यश आले आहे. हे अपहरण आर्थिक देवघेव मधून झाले असल्याची चर्चा आहे.

मुळ मुंबई व सध्या कुडाळ तालुक्तात असलेल्या एका ऊद्योजक व्यक्तीचे आर्थिक विषय प्रलंबित होते.यातून काही जण बुधवारी सायंकाळी कुडाळ एमआयडीसी येथे आले व संबधित व्यक्तीला आपल्या गाडीत बसवले व पळवून नेले.यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या चालकाला माराहाण केली. व हे सर्वजण त्यांच्या मुलाच्या समोरूनच सुसाट गेले.यावेळी अपहरण झालेल्या व्यक्तीकडे एक मोबाईल फोन होता.या फोनवरुन त्यांचे अचूक लोकेशन ट्रॅप केले गेले, व गाडीचा नंबर फोंडा येथे पाठवत तेथील चेकपोस्टवर या दोन्ही गाड्या पकडल्या गेल्या. मोबाईलचे लोकेशन मिळाल्याने अवघ्या दोन तासात या अपहरण करणार्‍या व्यक्तींच्या मुसक्या आवळण्यात कुडाळ पोलिसांना यश मिळाले आहे.अपहरण करण्यात आलेली व्यक्ती ही बिल्डिंग क्षेत्राशी संबंधित आहे.यातील एक कार पळून गेल्याचीही चर्चा आहे. मात्र याबाबत दाखल करण्याचे काम कुडाळ पोलिस स्थानकात उशिरा पर्यंत सुरु होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page