वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे आयोजन
वेंगुर्ला
वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी-काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिनानिमीत्त शनिवार १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कुबलवाडा येथील ओंकार मंगल कार्यालयात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करून जनसेवा देणाऱ्या १२ मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम आयोजीत करण्यांत आला आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिनानिमीत्त सर्व सामान्य जनतेला चांगल्या प्रकारची सेवा देणाऱ्या विविध क्षेत्रातील १२ व्यक्तींच्या सत्कार कार्यक्रमाचे नियोजन वेंगुर्ले शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, शहर अध्यक्ष सत्त्यवान साटेलकर, रयत शिक्षण संस्थेचे संचालक ऍन्थोनी डिसोजा, जिल्हा सदस्य तथा जिल्हा बँक माजी संचालक नितीन कुबल, डॉक्टरसेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, शहर महिला अध्यक्ष सुप्रिया परब आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजीत केलेल्या सत्कार कार्यक्रमांस संबधित सत्कारमुर्ती बरोबरच शहरातील राष्ट्रवादीच्या बेसिकसह विविध फ्रंटच्या पदाधिकारी, कार्यकर्त्याबरोबरच शरद पवार प्रेमी व हितचिंतकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी केले आहे.