तर ,कार्याध्यक्षपदी महेश जांभोरे, सचिव सागर सारंग, खजिनदारपदी अदिती दळवींची निवड..
नृत्यासाठी काम करणाऱ्या आणि नृत्य कलाकारांना संघटित करणाऱ्या नृत्य परिषदेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. राहुल दत्तात्रय कदम यांची नृत्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी तर महेश जांभोरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सोमवारी नृत्य परिषदेच्या राज्य स्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हि निवड जाहीर करण्यात आली.
राज्यभरातील नृत्य कलाकारांना एकत्र करून त्यांचे संघटन बांधण्याचे काम नृत्य परिषद करीत आहे. नृत्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातील सर्व नृत्यप्रेमी व नृत्य दिग्दर्शक यांना एकत्रीत करुन यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी व नृत्य क्षेत्रात वाढ करण्यासाठी नृत्य परिषदेची जिल्हानिहाय कार्यकारणी जाहिर करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी अलीकडेच झालेल्या नृत्य परिषदेच्या बैठकीत जाहीर करण्यात आली.
कुडाळ येथे जिल्ह्यातील सर्व नृत्य कलाकार, कोरिओग्राफर यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. नृत्य देवतेला अभिवादन करुन आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बैठकीला सुरवात झाली. या बैठकीला नृत्य परिषद महाराष्ट्र राज्य कार्यकारणीचे जतिन पांडे (कार्यकारणी सदस्य), आशुतोष राठोड (कार्याध्यक्ष), रत्नाकर शेळके (उपाध्यक्ष), अभिजीत संकाये (सल्लागार) आणि सागर बगाडे (पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख) उपस्थित होते. योगेश पांडे आणि सागर बगाड़े यांनी नृत्य परिषदेचे कार्य, हेतू आणि भविष्यातील उपक्रम याविषयी माहिती दिली. सभेच्या माध्यमातून जिल्हा तथा तालुका पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष राहुल राजदत्त कदम, कार्याध्यक्ष महेश जांभोरे, सचिव रोहित माने, सह सचिव – सागर सारंग, खजिनदार सौ.अदिती दळवी, प्रसिद्धी विभाग प्रमुख – निलेश जोशी, जिल्हा पालक – सौ.अनुजा गांधी, जिल्हा सह पालक – सुदेश वाडकर, युवती वरिष्ठा -कु.प्रियांका बांदकर, युवती श्रेष्ठा- कु.रुचिता शिर्के, युवती कनिष्ठा- कु.चांदणी कांबळी. तसेच तालुका उपाध्यक्षांची देखील निवड करण्यात आली. कणकवली योगेश – पाटणकर, कुडाळ भूषण बाक्रे, मालवण सौ. श्वेता चव्हाण, वैभववाडी – सुदीन तांबे, सावंतवाडी – पूजा पारधी, देवगड- समृद्धी प्रदीप तावडे,वेंगुर्ला आणि शिरोडा, दोडामार्ग रिक्त.