मराठा आरक्षणाबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत मराठा आरक्षणावरची स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. आता पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होणार आहे. मराठा आरक्षणाचे पुढे काय होणार ही लढाई सुरुच आहे. अशात आता अंतरिम स्थगिती उठवण्यास घटनापीठाने नकार दिला आहे. हे प्रकरण गंभीर आहे आणि मोठे आहे त्यामुळे विस्तृत सुनावणी जानेवारी महिन्यात केली जाईल असे या घटनापीठने म्हटले आहे. पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठापुढे आज सुनावणी पार पडली.