कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा सिंधुदूर्गचा अभिनव उपक्रम.
प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षक बंधू भगिनींनी एकत्र येत सोशल मीडिया यूट्यूब द्वारे बाबासाहेबांच्या जीवन चरित्राची श्रीमंती कविता सादर करून केली. प्रथम संघटनेच्या जिल्हा महिला विभाग प्रमुख नेहा कदम यांनी कालकथित कवी दफनवेणाकार आ.सो .शेवरे यांची उपेक्षितांच्या जीवनात प्रकाश खुलवणारी ‘डॉक्टर आंबेडकर’ ही कविता सादर करुन अभिवादन केले. यानंतर कवी मच्छिंद्र चोरमारे लिखित कविता संघटनेचे जिल्हा सरचिटणीस विकास वाडीकर यांनी सादर केली. कालकथित विद्रोही साहित्यिक ,कवी उत्तम पवार यांची तु प्रज्ञासूर्य ही कविता जिल्हाध्यक्ष किशोर कदम यांनी सादर करून अभिवादन केले . यानंतर जनार्दन भगत लिखित हे युगपुरुषा या कवितेचे दमदार वाचन केले ते देवगड तालुका शिक्षक संघटनेचे सरचिटणीस विद्यानंद शिरगावकर यांनी. शेवटी कोविड-19 च्या काळातील ऑनलाईन शिक्षण देता देता कणकवली तालुका कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संदीप कदम यांनी हे भिमराया ही बाबासाहेबांवर लिहिलेली स्वलिखित कविता सादर करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या शोषितांचा दाता ,स्वातंत्र्याचा दाता ,प्रज्ञेचा तारा ,क्रांतीचा धागा अशा विविध उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे या कवितेतून सादरीकरण केले. ऑनलाइन पद्धतीने सादर केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी च्या काव्यात्मक अभिवादनाचे हे अभिनव पुष्प खरेतर त्यांच्या जीवन कार्याची श्रीमंती वाढवणारे होते तसेच भारतीयांसाठी केलेल्या योगदाना विषयीची कृतज्ञता होती. निवेदन देवगड तालुका कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत साळुंके यांनी तर तंत्र सहाय्य अमिश साळुंके, भावेश मोरे यांनी करून संतोष शिरसागर ,महेश राठोड, सुमेध जाधव ,विलास कदम या सर्वांच्या सहकार्यातून हे अभिवादन यशस्वी झाले.