कुडाळ शहरातील श्री.लक्ष्मी देवीचा वार्षिक जत्रौत्सव उदया सोमवारी ०७ डिसेंबर रोजी होणार आहे. श्री लक्ष्मी मातेच्या जत्रौत्सवाला भाविकांची गर्दी उसळली असते.तर जत्रौत्सवानिमित्त लक्ष्मी देवीच्या मंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई केलेली असल्यामुळे देवीचे हे मंदिर विलोभनीय असेचं दिसते.तर जत्रौत्सवा दिवशी सकाळी ओटया भरणे,लक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते.तर पालखी प्रदक्षिणा नंतर रात्रौ उशिरा वालावलकर दशावतारी नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्य प्रयोग साजरा केला जाणार आहे. तरी भाविकांनी कोरोना चे सर्व शासकीय नियम पाळून दर्शन घ्यावे असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.