शिवसैनिकाने संघटना बांधणीची जबाबदारी स्वीकारून शहरात संघटना वाढण्यासाठी एकसंघ होणे गरजेचे आहे . सभासद नोंदणीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेतृत्व निर्माण करत आहोत. सेनेच्या हातात सत्ता यावी, आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा व्हावी यासाठी शिवसैनिकाने पेटून उठणे गरजेचे आहे. शिवसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली केलेले काम प्रत्येक जनतेपर्यंत पोचवा. बाळासाहेबांचे विचार प्रत्येक शिवसैनिकाने जोपासले. आता ती शिवसेना मोठी करण्याची जबाबदारीही शिवसैनिकाची . पुढील काळात वेंगुर्लेत भगवे वादळ निर्माण करा. संघर्षाचे रूपांतर विजयात करायचं असेल तर सेनेची संघटनात्मक बांधणी करा असे प्रतिपादन पक्ष निरीक्षक संदेश पारकर यांनी वेंगुर्ले येथे केले.

वेंगुर्ले शहरात शिवसेना सभासद नोंदणी शुभारंभ कार्यक्रम आज येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर, बाळा दळवी, शहरप्रमुख अजित राऊळ, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, जिल्हा पदाधिकारी सचिन वालावलकर, नगरसेवक तुषार सापळे, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, शहर समन्वयक विवेक आरोलकर, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, महिला शहर संघटक मंजुषा आरोलकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना तालुकाप्रमुख यशवंत परब म्हणाले की, तालुक्याचे केंद्रबिंदू हे शहर असत. शहरात बदलत्या राजकीय वातावरणाचा परिणाम निश्चितच तालुक्यावर होतो. यामुळे पुढील काळात पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शहरात शांतता, विकास पाहिजे असेल तर कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे विचार जनतेपर्यंत वपोचवावेत. व शहरात जास्तीत जात सभासद नोंदणी करावी. तर आगामी नगरपालिका निवडणुकीत आपला नगराध्यक्ष बसवण्यासाठी व शहराच्या विकासाच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी.असे उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी सांगत आपला विभाग व
शहरातून विक्रमी सभासद नोंदणी देण्याचा शब्द दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page