सिंधुदुर्गनगरी,/-
भंगारातून लाखो रुपयांची दारू वाहतूक केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले दोघे संशयित मुख्य सूत्रधार आहेत.त्यामुळे त्यांना जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद ग्राह्य धरून याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघांचा जामीन आज येथील न्यायालयाने फेटाळून लावला.या कामी सरकारी पक्षातर्फे अॅड रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
ही घटना २१ तारखेला घडली होती.यात गोवा ते नांदेड उत्तर प्रदेश, असे तब्बल ४४ लाखाची दारू वाहतूक करताना शेख सत्तार,शेख कासिम पटेल (वय ५०, रा.नांदेड), व मदन इंद्रजीत यादव (वय ४० उत्तर प्रदेश) या दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या खात्याकडून करण्यात आली होती.सद्यस्थिती दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.त्यांनी आपल्या जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र या प्रकरणात आणखी एक संशयित फरार असून अन्य कोणीही मुख्य सूत्रधार असल्याचे दिसून येत नाही. हेच सूत्रधार आहेत,असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून त्या दोघांनाही न्यायालयाने जामीन नाकारला.