चौके /-
काळसे येथील श्रीदेव लिंगेश्वर देवस्थाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक ९ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी धार्मिक विधी संपन्न होणार आहेत. रात्रौ पालखी मिरवणूक व त्यानंतर गोरे दशावतार नाट्यमंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाचे नियम व अटींचे पालन भाविकांनी करावे असे आवाहन श्रीदेव लिंगेश्वर देवस्थान समिती तसेच मानकरी व गावकरी यांनी केले आहे.