कुडाळ /-
नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या पावशी येथील श्री सातेरी देवीचा आज रविवारी वार्षिक जत्रौत्सव होत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पावशी येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान आहे.ही देवी नवस करणाऱ्या लोकांना पावते तसेच ती भक्तांच्या हाकेला पण धावते.तरी या श्री सातेरी देवीचा उदया रविवारी वार्षिक जत्रौत्सव साजरा होत आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर, बेळगाव, गोवा तसेच महाराष्ट्रात पावशी येथील श्री सातेरी मातेचे भक्त आहेत,तरी या जत्रोत्सव भाविकांनी शासनाचे नियम पाळून देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन देवस्थान समिती ने केले आहे.