सिंधुदुर्ग /-

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कृषी सेलचे अध्यक्ष समीर आचरेकर यांनी जिल्हा कृषी सेलची कार्यकारिणी जाहीर केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, सुनील भोगटे, जिल्हा सचिव भास्कर परब, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, जिल्हा चीटणीस रुपेश जाधव, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष नजीर शेख, देवगड विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, जयेश परब, संदेश मयेकर, वैभव सावंत,सतिश जाधव उपस्थित होते.

यावेळी कृषी सेलच्या जिल्हा सचिव पदी धनराज चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा उपाध्यक्ष विनोद डगरे, कुडाळ तालुका कृषी अध्यक्ष सुनील राऊळ, कणकवली तालुका कृषी अध्यक्ष चंद्रकांत नाईक, वेंगुर्ला तालुका कृषी अध्यक्ष बाळा पेडणेकर, सावंतवाडी तालुका कृषी अध्यक्ष सुनील सावंत, दोडामार्ग तालुका कृषी अध्यक्ष नितेश गवस, मालवण तालुका कृषी अध्यक्ष किरण रावले, देवगड तालुका कृषी अध्यक्ष मनोज नाईक, वैभववाडी तालुका कृषी अध्यक्ष अरूण सरवणकर यांची निवड करण्यात आली असून या सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

जिल्ह्यात शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावतानाच शेत मालाला योग्य बाजारपेठ मिळावी याकरता सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा कृषी सेल कार्यरत आहे. नव्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील शेतीविषयक प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नांवर काम करत असताना सामान्य माणूस नजरेसमोर ठेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा. आपण सदैव या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले. तर यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर यांनी यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना शेतकऱ्यांच्या समस्या सोडवताना राष्ट्रवादी पक्ष घराघरात पोचविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page