प्रशांत गवस/दोडामार्ग

तिलारी आंतरराज्य पाठबंधारे प्रकल्पात पुनर्वसित झालेल्या शिरंगे पुनर्वसन गावा मध्ये ठीक-ठीकानी मोरी बांधून ओहोळांचे पाणी नदीच्या पाण्यात सोडण्यात आले होते परंतु रात्री पडलेल्या अवकाळी पावसामुळे शिरंगे पुनर्वसन मधील मोरीसह पाण्याच्या प्रवाहाबरोबर पाईपही वाहून गेल्याने भररस्त्यावर भगदाड पडले असून एका वाडीतून दुसऱ्या वाडीशी असलेला संपर्क तुटलेला असून जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे. तसेच मोरी लगत असलेल्या घरांमध्ये रात्री अपरात्री पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उधाली आहे पडण्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे शिरंगे पुनर्वसन मध्ये ठीक-ठिकाणी नुकसान होवून वीज पुरवठा देखील खंडित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page