कणकवली येथील मोटरसायकल अपघतात 3 जण ठार..

कणकवली

कणकवली मुंबई-गोवा महामार्गावर जानवली कृष्णनगरी समोर झालेल्या भीषण अपघातात तीन ठार झाले आहेत. हा अपघात दोन मोटरसायकल शनिवारी दुपारी २ वाजता झाला असून मयत हे रत्नागिरी पाचलमधील दोन व कोल्हापूर येथील एक असे आहेत.तसेच आश्रफ प्रफुल्लकर(३५,रा.पाचल,राजापूर, रत्नागिरी) हे गंभीर असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मृत व्यक्तीमध्ये सात्तापा शिवाजी पाटील(२६),अजय हिंदुराव पाटील(२०,दोन्ही रा.आदमापूर, भुदरगड, कोल्हापूर),अस्लम अलोट(३०,रा.पाचल, राजापूर, रत्नागिरी) यांचा समावेश आहे.
हा दोन मोटरसायकल मध्ये झाला. दुचाकीवरील चौघेही जण फेकले गेले होते, यातील तिघांच्या डोक्याला दुखापत झाली.त्या तिघांचा मृत्यू झाला आहे.तर गंभीर जखमी उपचार सुरु आहेत.या अपघात स्थळी रक्त रस्त्यावर मोठ्याप्रमाणात सांडले होते.काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कदम सह कणकवली पोलीस दाखल झाले होते.दोघांचा मृत्यू जागीच झाला तर दोन जखमींना नागरिकांनी उपचारासाठी हलविले,मात्र त्यातील एकाचा मृत्यु हॉस्पिटलमध्ये झाला.या अपघाताची वाऱ्यासारखी बातमी पसरल्यानंतर नांदगाव येथील रज्जाक बटवाले यांच्यासह नांदगाव नागरिक कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.

अभिप्राय द्या..