कुडाळला आलेल्या नाटय गृहाचे श्रेय आमदार नाईक यांनी घेऊ नये.;त्यासाठी प्रयत्न हे खासदार राणेंचे.;नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळला आलेल्या नाटय गृहाचे श्रेय आमदार नाईक यांनी घेऊ नये.;त्यासाठी प्रयत्न हे खासदार राणेंचे.;नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळ /-

कुडाळ शहरात आलेल्या नाटय गृहाचे श्रेय आमदार नाईक यांनी घेऊ नये ,त्यासाठी लागलेले सर्व प्रयत्न हे खासदार नारायण राणे यांनी केले आहेत.आमदार वैभव नाईक हे केवळ कोट्यावधीचा निधी आणतात, पण त्यांनी आणलेला तो निधी नेहमीच कागदावर असतो, असा जोरदार टोला नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आज कुडाळ येथील हॉटेल स्प|ईस कोकण येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोविड काळात कोणतेही राजकारण न करता नगरपंचायतीने कुडाळ शहर कोरोना मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले. पण शिवसेनेच्या काही पदाधिकारी यांनी कोरोना महामारीत दुकाने उघडी ठेवली. तर काहीजण खासदार विनायक राऊत यांच्या जवळ जावून, कोणी सीईओवर दबाव टाकून स्वत: ची दुकाने चालू ठेवली. ते बाहेर काढण्याचा इशाराही ओंकार तेली यांनी दिला आहे.ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तेली म्हणाले, आदी भूसंपादन आणी नंतर काम हे तत्व असताना मुख्याधिकारी यांच्यावर दबाव आणून 308 खाली हा ठरव पाठवण्यात आला. पालकमंत्री व आमदार यांच्या दबावाखावी आमच्यावर केस केली.

जर आमदारांच्या बाजूने केस झाली असेल, तर दोन कोटी नगरपालिकेकडे का वर्ग केले नाहीत, महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सिंधुदुर्ग जिल्हाचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी सहा कोटी रूपये नगरोत्तन मधून दिले होते. त्यावेळी आम्ही पालकमंत्री दिपक केसरकर यांचा जाहीर सत्कार केला होता आणी आताही करतोय. आमदार वैभव नाईक यांनी उगाचच हा निधी आणला हे खोटे बोलू नये.

दिपक केसरकर यांनी हा निधी दिल्यावर कुडाळमधील काही शिवसेनेचे पुढारी यांना आमदार वैभव नाईक यांनी मातोश्रीवर केसरकर यांची तक्रार घेऊन गेले होते. पण हे सगळे तोंडघशी पडल्याच तेली यांनी सांगितलं.यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या सोबत कुडाळ नगरपंचायत चे नगरसेवक श्री.सुनील बांदेकर ,राकेश कांदे,विनायक राणे,नगरसेविका सौ.संध्या तेरसे , उपनगराध्यक्ष| सौ.सायली मांजरेकर ,सौ.साक्षी सावंत ,उषा आठले ,अश्विनी गावडे ,सौ. सरोज जाधव.उपस्थित होत्या.

अभिप्राय द्या..